वेळापूर – पोलीस स्टेशन येथे नूतन प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आशिष कांबळे यांनी सर्वसामान्य नागरिकांना बरोबर घेऊन न्याय देण्याची भूमिका स्पष्ट केली. वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांमध्ये शांतता, सुव्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले. यावेळी वेळापूर पोलीस स्टेशन येथे
यावेळी मावळते प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांची सोलापूर येथे बदली तर पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके यांची मोहोळ येथे बदली झाल्याबद्दल व व वेळापूर पोलीस स्टेशन चा पदभार आशिष कांबळे यांनी स्वीकारला यावेळी ग्रामस्थांच्या वतिने तीघांचीही फेटा बांधून हार घालून सत्कार करण्यात आला. व भाऊसाहेब गोसावी व आकाश शेळके यांना निरोप देण्यात आला.
यावेळी आशिष कांबळे म्हणाले, “पोलीस अधिकारी म्हणून माझे कर्तव्य केवळ गुन्हे दाखल करणे नाही, तर समाजात विश्वास निर्माण करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गावात शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देताना पारदर्शकता आणि निष्पक्षता राखली जाईल. पोलीस व जनता यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यावर भर देणार आहे.”
मावळते अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव सांगताना वेळापूरकरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “जनतेच्या पाठिंब्यामुळेच अनेक गुन्हे उघडकीस आणता आले आणि कायदा-सुव्यवस्था राखता आली,” असे ते म्हणाले. तसेच आकाश शेळके यांनीही वेळापूरमधील सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत सर्वांचे आभार मानले.
शुभेच्छा देण्यास राजकीय , विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने येऊन नूतन प्रभारी अधिकारी आशिष कांबळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.























