सोलापूर – एन्. एम्. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल हे गुरुपौर्णिमेला पुन्हा चालू करण्यात आले. समाजातील गरजू नागरिकांना योग्य व परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने वाडिया हॉस्पिटल सोलापूर येथे दिनांक २२ डिसेंबर ते २४ जानेवारी या काळात ४० वर्षावरील व्यक्तींसाठी सवलतीच्या दरात विशेष तपासणी योजना राबविण्यात येत असून या योजनेचे उद्घाटन माननीय खासदार अॅड. उज्ज्वल निकम साहेब यांच्या हस्ते वाडिया हॉस्पिटलमध्ये करण्यात आले.
ह्यावेळी संस्थेचे सचिव श्री, शिरीष गोडबोले, श्री. केतन व्होरा, डॉ. राजीव प्रधान, हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर सोडल, गवर्निंग कौन्सिल मेंम्बर अॅड. नितीन हबीब, श्री संजय पटेल, श्री.कल्पेश जव्हेरी, डॉ. राजेंद्र घुली, डॉ. शिरीश कुमठेकर, डॉ. संदीप भागवत, श्री. राजगोपाल मिणीयार, हॉस्पिटलचे अधिकारी, कर्मचारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

















