वळसंग – वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथे कै. वि.गु.शिवदारे यांच्या जन्मशताब्दी निमित्त बाप समजून घेताना या विषयावर प्रख्यात व्याख्यानकार श्री वसंत हंकारे यांचे व्याख्यान संपन्न झाले हा कार्यक्रम कै.वि. गु शिवदारे प्रतिष्ठान व श्रीशंकरलिंग हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी वि.गु शिवदारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्रजी गंभीरे,श्री शंकरलिंग स्कूल कमिटीचे चेअरमन शिवशरण थळंगे, श्री शंकरलिंग देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष श्रीशैल दुधगी, कमिटीचे विश्वस्त विश्वनाथ थळंगे माजी सरपंच सुरेश माशाळे, खासिम अमलीचुंगे व प्रतिष्ठानचे विश्वस्त सूर्यकांत ईसापुरे, प्रमोद बिराजदार, कमिटीचे विश्वस्त शिवशरण प्याटी , सिद्धारूढ काळे, प्रकाश दूधगी, मुख्याध्यापक वीरेश थळंगे,पर्यवेक्षक शिवानंद घोडके,वीरेश बागलकोटी व गावातील आजी-माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावना सतीश ईसापुरे यांनी केली व आभार प्रदर्शन नरेंद्र गंभीरे यांनी केले.


























