सांगोला – आपुलकी प्रतिष्ठानने गतवर्षीपासून रुग्णांच्या सोयीसाठी ऑक्सिजन मशीन, हॉस्पिटल बेड, पाण्याची गादी आदी साहित्य अल्प दरात उपलब्ध करून दिले आहे. आणखी कुठल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अभिनंदन गाडे यांनी पिताश्री कै.राजकुमार गाडे यांच्या स्मरणार्थ १ बेड त्याचबरोबर शिक्षक निसार इनामदार यांनी १ बेड प्रतिष्ठानला गुरुवारी भेट दिले.
यावेळी आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, रमेश देशपांडे, महादेव दिवटे, सुरेश चौगुले, अच्युत फुले, डॉ. सागर कांबळे, दत्तात्रय खटकाळे, श्रीकांत देशपांडे, अरविंद डोंबे, संग्रामसिंह गायकवाड, उमेश व्हटे, प्रतिक गाडे, विक्रम अडसूळ उपस्थित होते.
यावेळी आपुलकीचे सदस्य श्रीकांत देशपांडे यांनी आपल्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठानला २ हजार १६५ रुपयांची देणगी दिली.

























