नरखेड – मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील कै. शहाजीराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले.
या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष अरविंद पाटील यांच्या हस्ते आणि माजी प्राचार्य मोहन मोटे यांच्या अध्यक्षखाली करण्यात आले. .
या विविध कला गुण दर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भारुड, नाट्यछटा, कॉकटेल, कोळी गीत, विविध प्रकारचे लोकगीत, नाटक ,लावणी, स्टेज गीत, मूक नाट्य अशा विविध कलागुणांचा आविष्कार या ठिकाणी इयत्ता पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांनी करून दाखविला.
यावेळी , शिवाजीराव पाटील,अण्णासाहेब पाटील, बाळासाहेब मेंडगुळे, आनंद पाटील, पोलीस कॉन्स्टेबल धनाजी घोरपडे, पांडुरंग काळे, दिलीप मोटे, हनुमंत पवार, जगनाथ बनसोडे, मुख्याध्यापक मधुकर मोटे, बाळासाहेब मोटे, सर्व जिल्हा परिषद, माध्यमिक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ महिला पालक वर्ग, मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक धोत्रे यांनी केले तर आभार मधुकर मोटे , यांनी मानले. फोटो सोबत उद्घाटन प्रसंगी व डान्स करताना पाठवला आहे.
























