हाणेगाव / नांदेड : कै.बाळासाहेब देशमुख हाणेगावकर यांच्या ८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त यांना अभिवादन करण्यासाठी आनेक सामाजिक कार्यकम करुन अभिवादन करण्यात आले.
देगलुर तालुक्यातील तिन राज्याच्या सिमेवरती वसलेल्या हाणेगावला जिल्ह्यात धार्मीक शैक्षणिक व्यापारीक राजकीय क्षेत्रात एक वेगळी वळख मिळवुन देण्याचा मान या कै.बाळासाहेब देशमुख यांना जातो आहे . कै.बाळासाहेब देशमुख यांनी हाणेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक,सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, आनेक वर्ष ग्रामपंचायतीचे बिनविरोध सरपंच अशी अनेक पदे उपभोगून लोकनेता ,जननायक, समाजसेवक ,विकास पुरुष असे अनेक उपाधी घेण्याचा मान त्यांनी मिळविला अशा या महान लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी त्यांचे चिरंजीव विजयसिंह बाळासाहेब देशमुख (नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक ) प्रीतम बाळासाहेब देशमुख (भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष देगलुर) प्रशांत बाळासाहेब देशमुख (माजी सरपंच ग्रामपंचायत हनेगाव) प्रणव बाळासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक २१ रोजी हाणेगाव येथे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात शुक्रवारी रात्री ह.भ.प.प्रकाश महाराज साठे यांचे भव्य कीर्तन व भजन करून पुण्यस्मरण करण्यात आले .दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी 11 वाजता कै. बाळासाहेब देशमुख यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी अभिवादन सभा घेण्यात आली व जिल्हा परिषद शाळेत भिमशक्ती साजीक संघटणेचे तालुका अध्यक्ष किशोर आडेकर व सामाजीक कार्यकर्ते धनाजी होटले यांच्या वतीने विद्यार्थ्यांना फळ दूध वाटप करण्यात आले .व उदयगिरी लाइन्स नेत्र रुग्णालय यांच्यावतीने मोफत मोतीबिंदू तपासणी व अल्पदरात शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून गरजू लोकांना याचा लाभ मिळवून देण्यात आला तसेच अनेक आजाराने ग्रस्थ रुग्नांची वैद्यकीय तज्ञ अधिकाऱ्याकडुन तपासणी करण्यात आली .यावेळी देगलूर तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळी व हनेगाव परिसरातील सर्व भाविक भक्त मित्र मंडळ यांची लक्षणीय उपस्थिती होती तर शनिवारी दुपारी अन्नदान करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी गावातील व परिसरातील असंख्य लोकांनी याचा लाभ घेतला.



















