सोयगाव / संभाजीनगर – येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत ४ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.यात कै.बाबुरावजी काळे स्कूलचे प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे ९ विद्यार्थी आपल्या मॉडेलसह सहभागी झाले होते.
सद्यःस्थितीत जाणवणाऱ्या ई कचरा,सोलार ऊर्जा,शाश्वत शेती या संस्थांवर आधारित मॉडेल विद्यार्थ्यांनी तयार केले. यात माध्यमिक गटातून कुमारी प्रतिक्षा पगारे,१० वी (प्रथम क्रमांक) प्राथमिक गटातून वेदिका समाधान बावस्कर हिला (तृतीय क्रमांक ) मिळाला. त्याबद्दल सर्व सहभागी विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक विषय शिक्षक प्रा.योगेश काळे,जयश्री श्रीवास्तव,रुपाली मानकर यांचे अभिनंदन.
उपरोक्त यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे शिवज्योती शिक्षण प्रसारक मंडळाच्या अधक्षा ज्योतीताई काळे, सचिव देवीनाताई काळे – भटकर, संचालक शिवदीप काळे,सुनयना काळे,ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेश यादव,मुख्याध्यापक निलेश पाटील, प्रा.कमलेश काळे,उपमुख्याध्यापक प्रा.ज्ञानेश्वर एलिस,पर्यवेक्षक सागर घाटे,सर्व शिक्षक आणि पालकांनी अभिनंदन केले आहे.























