सोलापूर – वीरशैव कक्कय्या ढोर समाजाचे आराध्य दैवत, बसवशरण साहित्याचे रक्षण करणारे संत कक्कय्या महाराज यांच्या जयंतीनिमित्त संत वीरशैव कक्कय्या बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि स्वामी विवेकानंद युवक मंडळ, रविवार पेठ, ढोर गल्ली यांच्यावतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळेस शेरखाने आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वराच्या सामाजिक क्रांतीच्या चळवळीत त्यांच्यासोबत अखेरपर्यंत राहिलेल्या ‘शरण’ अनुयायापैकी ‘डोहर कक्कय्या’ हे एक महत्त्वपूर्ण सहकारी होते. कल्याण क्रांतीचा इतिहास ‘कक्कय्या’ शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. उपलब्ध शरण साहित्यातून कक्कय्यांचा अल्प इतिहास मिळतो. उज्जैन येथील श्रीकर हा क्रांतिपुरुष महात्मा बसवेश्वर यांना भेटण्यासाठी ‘कल्याण’ (बसव) येथे येतो. तेथे पहिल्याच भेटीत श्रीकर या ढोर जातीच्या माणसास बसवेश्वर हे ‘र्बी डोहर हळ्ळी कक्कय्या’ अशी साद देतात आणि श्रीकर समस्त शरणात ‘कक्कय्या’ या नावाने ओळखला जाऊ लागतो.
याप्रसंगी सूर्यकांत शेरखाने, संजीव धडके, नागनाथ सोनवणे, मुकुंद शिंदे, एडवोकेट बाबुराव खरात, सतीश शिंदे, रविंद्र गेंट्याल, चंद्रकांत शिंदे, सुनील इंगळे, सुरेश कटकधोंड, शंकर सोनवणे, उमेश सावळकर, सतीश शिंदे, गुरुनाथ जाधव, प्रकाश धडके, सुंदर शिंदे, विकी शिंदे, वैभव पोळ, गणेश शिंदे, गणेश कटकधोंड, विकी धडके, नारायण बोराडे, अनिल कटकधोंड, शक्ती कटकधोंड, कटके, सोनवणे आदी उपस्थित होते.

























