सांगोला – संगेवाडी ता.सांगोला येथे श्री महादेव मंदिर व श्री प्रभू अण्णा महाराज या मंदिरांचा कळसा रोहण सोहळा भास्कर वेदांताचार्य श्रीगुरु १०८ गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य दहिवडीकर महाराज यांच्या अमृत हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी कळसाची व गुरुची भव्य मिरवणूक गावातून काढून महामंगल आरती, माहेरवासीन ओटी भरण व भजन तसेच गुरुचे प्रवचन व महाप्रसाद वाटप करण्यात आला.
यावेळी पुरोहित म्हणून महादेव स्वामी, ओम स्वामी, आकाश स्वामी यांनी काम पाहिले. याप्रसंगी वसंत खंडागळे, रावसाहेब ताटे, अचिकेत खंडागळे, समाधान होवाळ, नागनाथ नष्टे, सुधीर खंडागळे, सुभाष पाटील, चंद्रकांत खंडागळे, राजेंद्र पवार, हरिभाऊ ताटे, बसवेश्वर पाटणे, रविराज स्वामी, नंदू स्वामी, स्वामी भाऊसाहेब, रविराज शेटे, सुधाकर खंडागळे, दीपक शिंदे, प्रभाकर पवार, धनाजी पवार, पांडुरंग खंडागळे, देविदास पवार, माणिक खंडागळे, गडया स्वामी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























