सांगोला – महूद येथील कल्याणी जितेंद्र बाजारे हिची जॉर्डन या देशात क्लासीक फॅशन या कंपनीत स्पोर्ट्सवेअर, एक्टिव्हवेअर आणि जिम्स् क्लॉथ फॅशन डीझाईनर म्हणून नियुक्ती झाली आहे. तिने यापूर्वी बेंगलोर येथे लँडमार्क ग्रुप या कंपनीत दोन वर्षे काम केले आहे.
सध्या ती मुंबई येथे शॉपर्स स्टॉप ली.कंपनीत फॅशन डीझाईनर म्हणून काम पहात आहे. तिचे प्राथमिक शिक्षण महूद येथील जि.प.प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, भाळवणी (ता.पंढरपूर) व संजीवन स्कूल, पन्हाळा येथे झाले आहे. तर पदवीपर्यंतचे शिक्षण पुण्यातील गरवारे कॉलेजमध्ये झाले आहे.
फॅशन डीझाईनचे उच्च शिक्षण पुणे येथील महर्षी कर्वेचे साॉफ्ट स्कूल ऑफ फॅशन डीझाईन येथे झाले आहे. या नियुक्ती बद्दल कल्याणी बाजारे हिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
























