वेळापूर -“कामधेनू सेवा परिवार । निराधारांचा आधार आहे. कामधेनू परिवार डाॅ.लक्ष्मणराव आसबे यांच्या पुढाकाराने विधवा – निराधार भगिनी,-अनाथ मुलांच्या जीवनात दिवाळी निमित्त प्रकाश तेजोमय व्हावा यासाठी सोळा वर्षापासून कार्यरत आहे.
१७ वा “भाऊबीज समारंभ” श्रीकृष्ण पॅलेस सुरवड ता.इंदापूर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह भ प विजयाताई विजयराव कोकाटे या होत्या.
यावेळी, व्यासपीठावर वीरपत्नी विद्या माधव पवार,वीरमाता,धर्म वीरांगना ह.भ.प.विजयाताई कोकाटे, मल्लसम्राट रावसाहेब मगर,कारखान्याचे संचालक व मान्यवर,माजी जि.प.सदस्यॲड. अर्जुनराव पाटील,श्रीकृष्ण राधा गुरूकुल शिक्षण संकुल व उद्योग परिवाराचे संस्थापक प्रा.प्रमोद आवताडे यांचे हस्ते दिपप्रज्वलन झाले. सुरुवातीला महाराष्ट गीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाराम झगडे यांनी केले.

यावेळी वीरपत्नी विद्या माधव पवार,धर्म विरांगना ह.भ.प.विजयाताई विजयराव कोकाटे यांचा विशेष सन्मान कामधेनू परिवाराच्या वतीने सौ.संजीवनी लक्ष्मण आसबे यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच श्रीकांत भगत व मातेचा,वीरपत्नी मोनिकाताई करडे,वीरमाता मस्के ताई,वीरमाता रास्तेताई, वीर पत्नी सुरेखाताई निवृत्ती जाधव, वीरपत्नी मोनिकाताई करडे तसेच साडी,चोळी,बांगड्या,स्नेहभोजन,बससेवा,जार पाणी,मोजमाप घेवून मुलांना ड्रेस शिवणारे, व कामधेनू परिवाराला मदत देणार्या दात्यांचा सत्कार करण्यात आला.
——————————————
श्रीकांत महेंद्र भगत—दौंड न्यायालयातील लिपिक.श्रीकांतच्या मातेला दोन लहान मुले असताना वैधव्य आले.कामधेनू परिवाराच्या समुपदेशनाने आत्महत्येचा विचार या मातेने सोडून दिला.दिवाळीचे कपडे,शैक्षणिक साहित्याची केलेली मदत मोलाची ठरली.या कृतज्ञतेपोटी श्रीकांत ने पहिला पगार आज ३५ हजार रुपये.कामधेनू परिवाराला अर्पण केला. भाऊबीज समारंभाचे हे फळ असल्याचे भावपूर्ण उदगार त्यांनी काढले.
——————————————
समाजभूषण शिवव्याख्याते डाॅ.लक्ष्मणराव आसबे म्हणाले की गुरूकृपेच्या आदेशाने समाजातील विस्तव मानला जाणारा हा वर्ग देव म्हणून पूजला.देणगी व वर्गणी न मागता भगवान परमात्मा व सदगुरूंच्या वरदहस्ताने हा उपक्रम सतरा वर्षे सुरू आहे.या भाऊबीज परिवारातील एकालाही जाणीव झाली तरी देव भेटला.आज श्रीकांतच्या रुपाने भेटला.जन्म देते ती आई व सांभाळ करते ती माता.कामधेनू परिवार विचार पेरतोय.वासनेलाच जाळावे लागते. असे सांगितले.
अमर शहिदांच्या पत्नीच्या नावा पुढे सौभाग्यवती लावले. हिंदूच्या भाऊबीजेला कामधेनू परिवाराच्या कार्यक्रमाला सतरा वर्षे जेवण देणारा मजीदखान पठाण हा आजच्या जातीय विषमतेला दिलेले किती मोठे उत्तर आहे.स्वत:चा भाऊ,बहिण दवाखान्यात ठेवून बांगड्या भरण्यासाठी दरवर्षीप्रमाणे उपस्थित झालेल्या बंधूचा, मंगळवेढ्याहून क्वायर वह्या देणारे संजय पाटील.परमेश्वरी वरदहस्त गुळवणी महाराजांच्या आदेशाने दरवर्षी घरातील व्यक्तीच्या वाढदिवसाला प्रत्येकी पाच हजार मुंबईचे जयंत कानडे नावाची अनभिज्ञ व्यक्ती कामधेनू परिवारिला कर्तव्य भावनेतून मदत करते.हा सदगुरूंचा मिळालेला आशीर्वाद आहे. यावेळी
साखर संघाचे राष्टीय अध्यक्ष मा.हर्षवर्धन पाटील म्हणाले की—कर्तव्य व दातृत्वाचा परिवार,उपेक्षित अनाथ व विधवा कर्तव्याचे पालन करणारा कामधेनू सेवा परिवार आहे असे सांगून ते पुढे वीरमातांना वंदन करून म्हणाले की.माणसाच्या मनात दानत असावी लागते.माझ्या मातीतल्या, समाजसेवेच्या भावनेतून किर्यरत कामधेनू परिवाराला मी एक लाख रूपये कर्तव्य म्हणून मदत दिली.मुलाच्या नावाबरोबर आईचे नाव लावण्याचे श्रेय कामधेनू परिवाराचे आहे.विधवांना सौभाग्यवती व सौभाग्यवतीचे अलंकार परिधान करण्यास समाजमान्यता देणारा व हे कृतीतून सिध्द करणार्या या परिवाराच्या कायमस्वरुपी पाठीशी राहणार असल्याचे शेवटी सांगितले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. या भाऊबीज कार्यक्रमाला मातांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
——————————————
विशेष या कार्यक्रमात स्वत:चा जीव धोक्यात घालून माणुसकीच्या भावनेतून पदाची गरिमा न बाळगता असहाय्य पूरग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणारे जिगरबाज धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा विशेष सत्कार कामधेनू परिवाराच्या वतीने नियोजित होता.कार्यबाहुल्याने ते उपस्थित नसले तरी संपूर्ण उपस्थित जनसमुदायांनी मानवते पोटी केलेल्या या मदतीच्या कृतज्ञतेपोटी टाळ्यांच्या प्रचंड गजरात ओमराजेंचे अभिनंदन केले.
——————————————