सोलापूर – शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये बालदिनाचे औचित्य साधून नर्सरी ते दुसरी च्या विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उदघाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अक्कन बळग संस्थेच्या अध्यक्षा प्रार्थना बिज्जरगी व उपाध्यक्षा निर्मला कनगी, रुपाली घोंगडे, सुलोचना नसके उपस्थित होते. तसेच कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार दादा करजगी, संस्थेच्या सचिवा वर्षाताई विभुते, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, प्राचार्या रुपाली हजारे, स्कुलच्या मार्गदर्शिका मीना पारखे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बालचमुंनी विविध प्रकारच्या व्यक्तीरेखा ची वेशभूषा सादर केली.यामध्ये छ.शिवाजी महाराज, सावित्री बाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची व्यक्तीरेखा साकारत त्यांचा इतिहास जागृत करण्याचा प्रयत्न केला. तसेच या स्पर्धेत कांतारा, मँगो ट्री, ऑक्सिजन,पाणी, ट्रॅफिक पोलीस यांच्या भूमिका सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळविली. सदर स्पर्धेसाठी प्रार्थना बिज्जरगी, रुपाली घोंगडे, सुलोचना नसके, निर्मला कनगी यांनी परीक्षक म्हणून कामकाज पाहिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार काजल कुलकर्णी यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षककेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


















