जेऊर – वांगी पंचायत समिती गणातील नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सोनाली तकिक यांचा शेटफळ ता करमाळा येथील जिव्हाळा ग्रुप व ग्रामस्थांच्या वतीने वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिजाऊ शेतकरी गटाचे अध्यक्ष हर्षाली नाईक नवरे होत्या यावेळी सन्मानाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य शिक्षण व रस्ते या संदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी आपले प्राधान्य राहणार असून मतदाराने आपल्यावर ठेवलेला विश्वास आपण सार्थ करू असे प्रतिपादन त्यांनी सत्काराला उत्तर देताना केले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की आम्ही पती-पत्नी आजपर्यंत परिसरातील वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये भाग घेत होतो. आमच्या नेत्या रश्मी दीदी बागल व दिग्विजय बागल यांनी मला उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास टाकला मित्र पक्षातील सर्व नेतेमंडळी व गणातील सर्व मतदारांनी आम्हाला साथ दिली यामुळे हा विजय होऊ शकला आहे लोकांच्या अनेक अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. उपस्थितांचे आमचे स्वागत माजी सरपंच मुरलीधर पोळ यांनी केले यावेळी गणेश मोरे नितीन तकिक मकाईचे माजी संचालक किरण पोळ यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार रोहित लबडे यांनी मानले या कार्यक्रमाला लोकविकास फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष वैभव पोळ विलास लबडे,कैलास लबडे प्रताप पोळ देगाव सोसायटीचे चेअरमन हरिचंद्र शेळके,लक्ष्मण गुंड पाटील योगेश घोगरे विजय लबडे ,राजेंद्र साबळे, प्रशांत नाईकनवरे नानासाहेब साळुंखे, महादेव पोळ महेश पोळ अतुल रोंगे गंगाधर पोळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















