बळीराम जगताप
वाशी धाराशिव
९४२१३५२७३८
कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे सेवा निवृत्ती निमित्त सेवा गौरव सोहळा संपन्न!
वाशी-कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथील मराठी विभाग प्रमुख प्रा.महेंद्रकुमार चंदनशिवे व किमान कौशल्य विभागाकडील प्रा.शहाजी चेडे यांच्या सेवा निवृत्ती निमित्त सेवा गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक व पुरोगामी विचारवंत मा.डॉ प्रल्हाद लुलेकर कार्यक्रमाचे अध्यक्ष व श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी चे अध्यक्ष मा.डॉ बी वाय यादव संस्थेचे खजिनदार मा.जयकुमार बापू शितोळे महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा.मछिंद्र तात्या कवडे, वाशी नागरपंचात चे उपनगरध्यक्ष मा.सुरेश बप्पा कवडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गंभीरे व माजी प्राचार्य डॉ.चंद्रकांत मोरे,डॉ.सूर्यकांत जगदाळे,डॉ.कुसुम मोरे व डॉ.शारदा मोळवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बोलताना प्रमुख पाहुणे डॉ.प्रल्हाद लुलेकर म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले,राजर्षी शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या परंपरेचे पाईक असलेले डॉ.मामासाहेब जगदाळे यांनी गोरगरीब दिनदलित तसेच स्त्री शिक्षणासाठी डोंगराएवढे मोठे काम केले आहे.त्यांच्या विचारांची कास धरूनच या संस्थेतील सर्व पदाधिकारी प्राचार्य प्राद्यापक व प्राध्यपकेत्तर कर्मचारी काम करत आहेत. याचा मला आनंद होत आहे. स्त्री शिक्षणाचे हे काम अधिकाधिक चांगल्या प्रकारे होणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी चे अध्यक्ष मा.डॉ बी वाय यादव म्हणाले कि, सेवा निवृत्त कर्मचाऱ्याने महाविद्यालय विकासासंबंधी तसेच चांगल्या उपक्रमासाठी संस्थेला सहकार्य करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते प्रा.महेंद्रकुमार चंदनशिवे व प्रा.शहाजी चेडे यांचा सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गंभीरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.अशोक पाटील तर आभार प्रा.डॉ आनंद करडे यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वृंद कर्मचारी विद्यार्थी व बार्शी येथील प्राध्यापक वृंद कर्मचारी उपस्थित होते.