श्रीपूर – ता . माळशिरस येथिल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट मांजरी ( पुणे ) यांचा गळीत हंगाम २०२४ / २५ मध्ये केलेल्य उल्लेखनीय कार्याबद्दल तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय पुरस्कार जाहीर झाला असून, त्याचे वितरण पुणे येथे दि २९ डिसें . २५ रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी दिली . यावेळी व्हा.चेअरमन कैलास खुळे , कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे, संचालक मंडळ व डॉ यशवंत कुलकर्णी व अधिकाऱ्यांनी केलेले उत्कृष्ट नियोजन व तत्परतेमुळे वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट मांजरी , पुणे या संस्थेचा तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय पुरस्कार मिळाला असून पुरस्कार मिळविण्याची मालिका अखंडित सुरु ठेवली असल्याचे सांगितले .
तर कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी, कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व संचालक अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने हा पुरस्कार मिळाला असून या पुरस्कारासह आजपर्यंत कारखान्यास राज्य व देश पातळीवरील ६१ पुरस्कार प्राप्त झाले असल्याचे सांगितले कारखान्याचा गळीत हंगाम २०२४ / २५ कारखान्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. या हंगामात कारखान्याने ८ लाख १ हजार १५१ मे. टन ऊस गाळप करून ७ . ६४ लाख क्विं. साखर उत्पादित केली असून ११ % साखर उतारा मिळविला आहे. कारखान्याच्या तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करून कारखान्याने या हंगामात अखेरपर्यंत उसाचे गाळप करून कमीत कमी लॉसेस ठेवून विनाखंड गाळप केले. वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट मांजरी बु.॥ पुणे यांनी कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ, साखर उताऱ्यात वाढ, कमीत कमी लॉसेस, स्टीमचा कमीत कमी वापर, जास्तीत जास्त वीज एक्स्पोर्ट, कारखाना बंदचे प्रमाण खूपच कमी इत्यादी मध्ये उल्लेखनीय काम केल्यामुळे कारखान्यास राज्य पातळीवरील तांत्रीक कार्यक्षमतेचा तृतीय पुरस्कार मिळाला आहे. राज्यपातळीवर पुरस्कार मिळालेबद्दल कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक मालक व व्हा.चेअरमन कैलास खुळे यांनी कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व अधिकारी वर्गाचे आणि कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले.
यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, दिलीपराव चव्हाण,उमेशराव परिचारक, ज्ञानदेव ढोबळे, . तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे ,भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हनुमंत कदम, .किसन सरवदे, दिलीप गुरव, शामराव साळुंखे, राणू पाटील, दाजी भुसनर आदी व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.
चौकट- कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद श्री.शुक्राचार्य खंडू गवळी मु.पो.भाळवणी ता.पंढरपूर यांना मध्य विभागात हेक्टरी 255.02 मे.टन ऊस उत्पादन केल्यामुळे त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटचा ऊस भुषण पुरस्कार जाहीर झाला आहे.


























