तभा फ्लॅश न्यूज/वाशी : बाल संस्कार प्राथमिक विद्यामंदिर ची विद्यार्थिनी कार्तिकी क्षीरसागर हिने जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत दुसऱ्या वर्षी ही यश प्राप्त केले. असून तिने सुवर्णपदक पटकावले आहे. धाराशिव येथे तुळजाभवानी स्टेडियमवर योगा स्पर्धा दिनांक 20 रोजी पार पडल्या होत्या.
कुमारी कार्तिकी क्षीरसागर ही वाशी येथील बाल संस्कार प्राथमिक विद्यामंदिर मधील इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी असून ही दरवर्षी योगासन स्पर्धेत भाग घेत आहे. गतवर्षी तीने सुवर्ण पदक प्राप्त केले होते चालू वर्षी तिने घवघवित यश प्राप्त करून सुवर्णपद पटकावले आहे. तिचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या यशाबद्दल शाळेच्या वतीने तिचा सत्कार करून तिला शुभेच्छा दिल्या.