सोलापूर – स्वर्गीय दिगंबर बुवा कुलकर्णी स्मृती ट्रस्ट व स्वर्गीय दत्तात्रय दिगंबर कुलकर्णी स्मृती प्रित्यर्थ सोलापुरातील सेवासदन प्रशाला येथे राज्यस्तरीय तबलावादन स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये वेणू गोपाल संगीत विद्यालय येथील विद्यार्थी कौस्तुभ ज्योतीराम चांगभले याने लहान गटात प्रथम क्रमांक मिळवला. कौस्तुभ याला झंकार कुलकर्णी, शर्वरी कुलकर्णी व रूपक कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
लहरा साथ कुमारी आदिती कुलकर्णी यांनी केली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून बाल गटात 37 तबलावादक यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे आयोजन संदीप कुलकर्णी यांनी केले होते.स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. सचिन कचोटे सर व पांडुरंग मुखडे यांनी केले.कौस्तुभ हा सोलापुरातील सुप्रसिद्ध मृदंग वादक ह.भ.प ज्योतीराम महाराज चांगभले यांचा सुपुत्र आहे.
कौस्तुभचे अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष ह भ.प.सुधाकर महाराज इंगळे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंग वादन शिक्षण संस्था सोलापूर यांनी अभिनंदन केले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

























