सोलापूर – जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि इलिसम क्लब ऑर्गनायझेशन स्पर्धेत, एस शटलर्स बॅडमिंटन अकादमीचा विद्यार्थी केतन हेबाळे याने ८ वर्षांखालील गटातील एकेरी गटाचा अंतिम सामना जिंकून एक आदर्श निर्माण केला. त्याने अतिशय उत्तम खेळ दाखवत अंतिम सामना जिंकला. एस शटलर्स बॅडमिंटन अकादमीचे मुख्य प्रशिक्षक अर्शद गफूर शेख आणि सहाय्यक प्रशिक्षक श्रीराम कुलकर्णी त्याला प्रशिक्षण देत आहेत.
केतनचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आणि त्याच्या गटाच्या वतीने त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

























