शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसनराव मोरे यांचे तहसीलदारांना निवेदन…..
मंठा/ प्रतिनिधी : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी व चोवीस तास वीजपुरवठा मोफत द्यावा या व इतर मागण्यांसाठी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य किसनराव मोरे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. या संदर्भात तहसीलदार सोनाली जोंधळे यांना शुक्रवार ता.2 रोजी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर निवेदन देऊन चर्चा केली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, चोवीस तास वीज पुरवठा व मोफत द्यावा, सततच्या रिमझिम पावसामुळे पिवळे पडलेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी,
सन 23-24 मधील हरभरा पिकांच्या पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी, शेतकऱ्यांच्या शेतीमालास हमीभाव देण्यात यावा, सन 2023 – 24 चे दुष्काळी अनुदान वाटप करावे आदी मागणी निवेदनात करण्यात आले आहेत. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य न केल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष किसनराव मोरे, शिवप्रसाद मोरे, अर्चना राऊत, मुन्ना ढवळे, विष्णुपंत बोराडे, भगवान बोराडे, जगन दवणे, पंकज दवणे, राजू दवणे, संतोष ढवळे, पांडुरंग काळे, कैलास दवणे, राजेभाऊ खवणे, संदीप वैद्य, प्रभाकर वैद्य, पुरुषोत्तम वैद्य यांच्या सह्या आहेत.