जालना – 26 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान लॅटिन अमेरिका मधील san luis potosi येथे पार पडणाऱ्या लॅटिन अमेरिकन वर्ड पोलीस अँड फायर गेम्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जालना येथील राज्य पोलीस दलातून जालना येथील किशोर ज्ञानेश्वर डांगे यांची निवड करण्यात आलेली आहे.
या स्पर्धेत श्री किशोर डांगे हे शरीरसौष्ठव क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवणार असून, ते या स्पर्धेत सहभाग नोंदवणारे जिल्ह्यातील एकमेव खेळाडू ठरले आहेत. या स्पर्धेत जालना जिल्ह्याच्या खेळाडूला स्थान मिळणे ही अभिमानाची बाब आहे.
भारतीय पोलीस संघाला लॅटिन अमेरिकन वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स साठी आमंत्रित करण्यात आलेले आहे व या संघात जालन्याचा होतकरू खेळाडू किशोर डांगे हे देखील सहभागी असणार आहे.. या स्पर्धेसाठी पोलीस दल आणि अग्निशामन विभागातील जगभरातून वेगवेगळ्या खेळासाठी अंदाजे 2500 खेळाडू सहभागी होणार आहेत.
किशोर डांगे यांना या स्पर्धेसाठी निमंत्रित करणे ही बाब जालना जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा मानल्या जात आहे. सर्व स्तरातून किशोर डांगे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे…


















