सांगोला – सह्याद्री फार्मसी कॉलेज, मेथवडे (ता.सांगोला) येथील डी.फार्मसी अभ्यासक्रमाच्या फार्मसी क्षेत्र भेटी अंतर्गत प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी एस.जी.फायटो फार्मा पीव्हीटी एलटीडी, कोल्हापूर या कंपनीस भेट दिली.
कंपनीच्या व्यवस्थापकांनी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून कंपनीची तसेच फार्मासिस्टचे फार्मा कंपनीतील महत्व, कार्य, व्याप्ती याबद्दल माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ग्रुप करून कंपनीतील सर्व विभागास भेटी दिल्या. औषधे बनवणारी यंत्रसामुग्रि, त्याचे गुणनियंत्रण व लॅब, लेबलिंग, पॅकिंग, स्टोरेज तसेच टॅबलेट, कॅप्सूल, पावडर, द्रव औषधे, अर्ध-द्रव औषधे बनवणाऱ्या सर्व विभागास भेटी देऊन माहिती संग्रहित केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची व शंकेचे निवारण कंपनीतील कर्मचाऱ्यांनी केले. त्याबद्दल त्यांचे सर्वांनी आभार मानले. या शैक्षणिक सहलीस प्रा.एस.एस.काळे, प्रकाश पाटील, प्रा.एस.ए.माने, प्रा.ए.व्ही.सपाटे यांचे मार्गदर्शन लाभले.


















