जालना :- पांगरी गोसावी येथील कोमल कैलास जाधव हिची हेडगेवार डेंटल कॉलेज, हिंगोली येथे BDS (Bachelor of Dental Surgery) या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.
कोमल ही जिल्हा परिषद नांद्रा विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास जाधव यांची कन्या असून तिच्या परिवारात वैद्यकीय क्षेत्राची परंपरा आहे. कोमल चे काका MBBS-MD असून भाऊ देखील MBBS डॉक्टर आहेत. ह्या मध्ये सर्वांत महत्त्वाचे कोमल चे आजोबा भिमराव जाधव यांना शिक्षणाची आवड होती. त्यांच्या पाठबळामुळे एकाच कुटूंबातुन 3 डॉक्टर झाले
या यशाबद्दल पांगरी गोसावी ग्रामस्थांनी कोमल हिला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. जाधव परिवारावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.




















