जेऊर – जि.प.प्रा.शाळा शेलगाव (वांगी),(ता.करमाळा) शाळा व्यवस्थापण समिती मध्ये अध्यक्ष म्हणून प्रा.सतीश कोंडलकर तर उपाध्यक्ष म्हणून मयुर खाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळा व गावकऱ्यांचा समनवय साधून प्राथमिक शिक्षणाचा सुधारला जातो.श्री.कोंडलकर हे उच्च शिक्षित असून शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा जिल्हा परिषदेच्या शाळेला निश्चितच उपयोग होईल.
प्राथमिक शाळेत निवड प्रक्रिया पूर्ण झाली या वेळी शेलगावचे सरपंच अमरदादा ठोंबरे, उपसरपंच भारतआप्पा पोटे, माजी सरपंच नवनाथ (आबा) केकाण, माजी उपसरपंच दत्तूनाना केकाण, तंटामुक्त समिती अध्यक्ष वसंतदादा केकाण, पोलीस पाटील नवनाथ केकाण, चेअरमन बाबासाहेब केकाण, ग्रामपंचायत सदस्य अमितदादा केकाण, विठ्ठल मारकड, मुख्याध्यापक वाघमारे सर, सर्व शिक्षक स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

























