ठाणे, 19 जून, (हिं.स) कोकणच्या विकासासाठी पुन्हा एकदा कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ॲड. निरंजन वसंतराव डावखरे यांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पदवीधर मतदारांना केले आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघातील होऊ घातलेल्या निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार ॲड. निरंजन वसंतराव डावखरे हे कोकण पदवीधर निवडणुकीत उभे आहेत. गेली १२ वर्ष विधानपरिषदेमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना उत्कृष्ट अशी कामगिरी ॲड. निरंजन वसंतराव डावखरे यांनी केली आहे. पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचे शिक्षणाचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न असे कोकणातील विविध प्रश्न विधानपरिषदेच्या माध्यमातून त्यांनी मांडले. ते सोडविण्याचा ॲड. निरंजन वसंतराव डावखरे यांनी प्रयत्न केला. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार ॲड. निरंजन वसंतराव डावखरे हे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. २६ जून २०२४ रोजी मतदान आहे. माझी कोकणातील सर्व पदवीधरांना विनंती आहे की येत्या २६ जूनला न विसरता मतदानाचा हक्क बजवायचा आहे आणि ॲड निरंजन वसंतराव डावखरे यांच्या नावासमोरील एक सरळ उभी रेष काढून आपले अमूल्य मत त्यांना देऊयात आणि कोकणच्या विकासासाठी पुन्हा एकदा ॲड. निरंजन वसंतराव डावखरे यांना विजयी करुन कोकण विकासाची हमी घेऊयात, असे आवाहन प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सर्व पदवीधर मतदाराना केले आहे.