नवी दिल्ली, १९ जून, (हिं.स) इराणच्या ईशान्येकडील काश्मार शहरात झालेल्या भूकंपात ४ जणांचा मृत्यू झाला. तर १२० जण जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता ४.९ रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपामुळे येथील जीर्ण इमारतींचे फार नुकसान झाले आहे. भूकंपाचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. त्यात अनेक इमारती ढिगा-याखाली गेल्या असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, येथील परिसरात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मागील वर्षी इराणच्या वायव्य पर्वतीय प्रदेशात झालेल्या भूकंपात तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर ८०० हून अधिक लोक जखमी झाले होते.
हिंदुस्थान समाचार