सोलापूर – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती दरवर्षी ११ एप्रिल रोजी साजरी केली जाते. १८२७ मध्ये पुण्यात जन्मलेले ज्योतिबा फुले एक महान भारतीय समाजसुधारक, विचारवंत आणि स्त्री शिक्षणाचे जनक होते, ज्यांनी जातिभेद, अस्पृश्यता आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला.
महाराष्ट्रात आणि देशभरात त्यांच्या सामाजिक योगदानाचे स्मरण करत ही जयंती साजरी होते. या दिनाचे औचित्य साधून पोदार इंटरनॅशनल स्कूल, धाराशिवचे प्राचार्य डॉ. वाल्मिक सोमासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच क्रांंतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आपल्या लघु नाटिकेतून विद्यार्थ्यांसमोर सादर केले.
याप्रसंगी स्कूलचे उपप्राचार्य श्री निलेश जाधव सर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आदर्श घालून घ्यावा असा संदेश दिला. या कार्यक्रमाच संपूर्ण नियोजन इयत्ता नववीच्या वर्ग शिक्षिका विजयमला दराडे मॅडम यांनी केले. यावेळी स्कूलचे उपप्राचार्य श्री निलेश जाधव सर, कार्यक्रमाधिकारी सुप्रिया राहीगुडे मॅडम तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी देखील उपस्थित होते.


























