सोलापूर – पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा ( एन एम एम एस ) परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या परीक्षेसाठी पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये
1.श्रेयस सुनील उदगिरी
2.सुनील अमर गुंजाळ
3.राजवीर संतोष पवार
4.ऋषिकेश गिरीष पोला
5.श्रीहर्ष अंबादास गोडबरलू या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना प्रशालेतील सहशिक्षक शरीफ चिखळ्ळी , शुभांगी माने, सपना मोरे, शिवशंकर स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड श्रीनिवास क्यातम, उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम, शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली तसेच प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगु, प्रणिता सामल ,मल्लिकार्जुन जोकारे यांनी कौतुक केले.

























