माढा : उपळाई खुर्द येथील विनंती कुलकर्णी यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी त्या युवती जिल्हाध्यक्ष होत्या. त्यांनी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार पक्ष वाढीसाठी व त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन पक्षाने जिल्हाध्यक्षा पदावरून त्यांना बढती देत राष्ट्रवादी काँग्रेस श.प पक्षाच्या युवती प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड केली आहे.या निवडीचे पत्र शुक्रवारी अकलूज येथे पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील,शिवबाबा मोहिते पाटील, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक गोविंद पवार,वसंत नाना देशमुख रवींद्र पाटील, राम मस्के ,वृषाली चौगुले,राजीव मोहिते , राणबा कदम, अवधूत कुलकर्णी,वंदना कदम, कांचन कदम,मनीषा कुलकर्णी, मेघा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच विनंती कुलकर्णी यांच्यावर सोलापूर जिल्हा ग्रामीण युवती जिल्हाध्यक्ष पदाची ही जबाबदारी देण्यात आली आहे.
सौ कुलकर्णी यांनी युवती प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व पक्षाच्या वरिष्ठांनी मोठी जबाबदारी दिल्याने वरिष्ठांचे आभार मानले. मी त्या संधीचे सोने करून पक्षाच्या ध्येय धोरणानुसार तळागाळातील व सर्वसामान्यांसाठी काम करून पक्ष वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राज्यातील युवतीच्या हक्क, प्रश्न व सुरक्षेसाठी आवाज उठवेल असे मत व्यक्त केले आहे.
निवडीनंतर विनंती कुलकर्णी त्यानां अनेकांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला.


















