अकलूज – सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यात लक्ष्मीपूजन व सरस्वतीपूजन संपन्न. तसेच परिसरातील सर्व सहकारी संस्थांमध्येही लक्ष्मीपूजन व सरस्वती पूजन उत्साहात साजरे करण्यात आले.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना मुख्य कार्यालयामध्ये मंगळवार दिनांक 21/10/2025 रोजी सायंकाळी 5:10 वाजता कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, कु.स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील संचालिका सो. व व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख यांचे उपस्थितीत लक्ष्मीपूजन व सरस्वतीपूजन संपन्न झाले. सदर कार्यक्रमास संचालक सर्वश्री लक्ष्मण शिंदे, नानासाहेब मुंडफणे, अमरदीप काळकुटे, गोविंद पवार, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक प्रकाशराव पाटील, कार्यलक्षी संचालक रणजीत रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टीमेडिया लेजर शो कमिटी सदस्य सर्वश्री पांडुरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, राजेंद्र भोसले, धनंजय सावंत, श्रीकांत बोडके माजी संचालक सर्वश्री भिमराव काळे, मोहनराव लोंढे, महादेवराव घाडगे, सुनील एकतपुरे, धनंजय चव्हाण, खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघात संचालक उध्दव जाधव यांच्या हस्ते लक्ष्मी पूजन करण्यात आले.
यावेळी संचालक त्रिंबक इंगळे , हरिभाऊ मगर, संग्रामसिंह रणनवरे, कार्यकारी संचालक रविराज इनामदार आदी उपस्थित होते. शिव शंकर बाजार येथे चेअरमन व सर्व संचालक मंडळाच्या हस्ते पूजन करण्यात आले सुमित्रा पतसंस्थेमध्ये चेअरमन महादेव अंधारे यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले यावेळी संस्थापक जयसिंह मोहिते पाटील विजय शिंदे विजय जोशी सुभाष दळवी अशोक जावळे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सचिव राजेंद्र काकडे यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले.
यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते याचबरोबर विजय रत्न पशु पक्षी संवर्धन संस्था रत्नप्रभादेवी बीज उत्पादक सहकारी संस्था शंकराव मोहिते पाटील सहकारी बँक आधी ठिकाणीही लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले तसेच व्यापारी व नागरिकांनीही पारंपारिक पद्धतीने घरगुती लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात साजरे केले लक्ष्मीपूजनाच्या या दिवाळीतील महत्त्वाच्या दिवशी नागरिकांनी उत्साहाने पूजन केले व फटाक्यांची अतिश बाजी केली.

फोटो
सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील पूजा करताना.
सुमित्रा पतसंस्थेत चेअरमन महादेवा अंधारे पूजा करताना यावेळी जयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.
जयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करताना महादेव अंधारे