सांगोला – पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित सांगोला तालुक्यातील विद्यार्थी गुणवत्ता शोध चाचणी (टॅलेंट हंट) स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.
या स्पर्धेत जि.प.प्राथमिक शाळा, लक्ष्मीनगर मधील इ.२ च्या पियुष राजेंद्र नरळे याने कथाकथन स्पर्धेत आदर्श न्यायाधीश छत्रपती शिवराय ही कथा सादर करून द्वितीय, तर इ.४ च्या मुलींच्या गटाने समूह गीत गायन स्पर्धेत हिरवी छाया हिरवी माया हे पर्यावरण विषयक लोकप्रिय लोकगीत गाऊन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रवेश मिळविला.
या यशाबद्दल गट शिक्षण अधिकारी सुयोग नवले, विस्तार अधिकारी कुमठेकर, केंद्रप्रमुख धनंजय महाजन, मुख्याध्यापक संजय महाजन, लक्ष्मीनगरच्या सरपंच राणीताई बाड, शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्य, ग्रामस्थ आणि पालकांनी यशस्वी मुलांचे व शाळेचे कौतुक केले.


















