लालपरीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रकारच्या बसेसचे तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हंगामी काळात बसच्या तिकीट दरात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही तिकीट दरवाढ हंगामी राहणार असून एप्रिल ते 15 जूनपर्यंत ही भाडेवाढ असणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तिकिटाचे दर पूर्ववत केले जाणार आहेत.
भाडेवाढीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.