बार्शी – संस्कृतभारती सरळ सोप्या पद्धतीने संस्कृत भाषा बोलण्यासाठी भारतभरामध्ये कार्यरत आहे . ज्यांचे दहा दिवसाचे संभाषण शिबिर झालेले आहे त्यांच्यासाठी पुढील टप्पा म्हणून भाषाबोधन वर्ग आयोजित केला जातो.
शिवस्मारक येथे दि. ३० नोव्हेंबर रोजी आयोजित सोलापूर जिल्हा भाषाबोधन वर्गासाठी वयोवर्ष १५ ते ७० असे ३९ विद्यार्थी सहभागी होते. भाषाबोधन वर्गाची सुरुवात सोलापूर जनपद संयोजक श्री. निखिल बडवे व्यासपीठावरील इतर मान्यवरांच्या हस्ते भारतमाता प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. ध्येयमन्त्र पठणानंतर प्रत्यक्ष वर्गाला सुरुवात झाली.
जितेश सोनार,आनंद कुलकर्णी, श्रुती देवळे, वंदना कुलकर्णी,अश्विनी कुलकर्णी, विजयकुमार काळेगोरे तसेच प्राची कुंटे यांनी व्याकरण आधारित सत्रे घेऊन मार्गदर्शन केले.
समारोप सत्रासाठी डॉ. गजानन अंभोरे पश्चिम मध्यक्षेत्रमंत्री (पश्चिम महाराष्ट्र प्रांत, देवगिरी प्रांत तथा विदर्भ प्रांत) यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी संस्कृत भाषेच्या प्रचार- प्रसारासाठी प्रत्येकाने आपल्या वेळाचा काही भाग दिला पाहिजे.
दातृत्वाची भावना स्वतः मनापासून जागृत करावी, असे विचार त्यांनी मांडले. भाषाबोधन वर्ग याचे सूत्रसंचालन प्रदीप आर्य यांनी केले. वर्ग यशस्वीतेसाठी सर्व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.
























