पेट्रोल डिझेलला पर्याय ठरू पाहणाऱ्या मिथेनचे साठे चंद्रपूरच्या भद्रावती मध्ये आहे. त्याचा सुद्धा उपयोग औद्योगिक वाढीसाठी होईल, असं केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. नागपूरमध्ये एका आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.
ते म्हणाले की, विदर्भाला सर्वच क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी औद्योगिक विकास महत्त्वाचा आहे याच हेतूने विदर्भातील औद्योगिक क्षमता विकसित करणे ,तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, स्टार्टअप्स आणि उद्यमशीलतेला चालना देणे, विक्रेता विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे, नवीन तंत्रज्ञानाचा परिचय करून देणे, रोजगारासाठी नवकल्पना आणि पोषक वातावरण निर्माण करणे आणि यशस्वी उद्योजकाच्या यशोगाथा प्रदर्शित करण्यासाठी नागपूर मध्ये येत्या 27 ते 29 जानेवारी दरम्यान खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.