हिंगोली – औंढा नागनाथ तालुक्यातील पदवीधर मतदार नोंदणीसाठी दावे व हरकती दाखल करण्यासाठी अठरा डिसेंबर २०२५ ची तारीख जाहीर झाली असल्याची माहिती पदनिर्देशीत अधिकारी तथा तहसीलदार हरिष गाडे यांनी दिली आहे,त्यासाठी औंढा नागनाथ,जवळा बाजार,साळणा,येहळेगाव सोळंके येथे चार मतदान केंद्रावर बिएलओ तथा मंडळ अधिकारी यांचे आदेश काढण्यात आले आहेत.
कार्यालयीन वेळेत अर्ज दाखल करण्यासाठी उर्वरित पात्र पदवीधर यांनी अर्हता दिनांक पाहून अर्ज दाखल करावे, विहित नमुन्यातील अर्ज संबंधितांकडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत , पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, पदवी ची झेरॉक्स प्रत, आधार कार्ड,मतदान कार्ड व अर्जावर सही करुन संबंधितांकडे अर्ज दाखल करावे असे आवाहन नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांनी केले आहे.
तसेच पदवीधरची प्रारुप मतदार यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली असून संबंधित बिएलओ तथा मंडळ अधिकारी व तहसील कार्यालय निवडणूक शाखेत पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

























