मुंबई, 20 नोव्हेंबर (हिं.स.) – मतदानाची टक्केवारी खूप कमी होत आहे.अलीकडच्या निवडणुकांत शहरी भागात सुद्धा मतदान टक्केवारी कमी राहिली आहे.उलटपक्षी जम्मू काश्मीर आणि गडचिरोली सारख्या दुर्गम भागात मतदान टक्केवारी वाढत आहे.मतदानासाठी सुट्टी दिल्यानंतर ही मतदान वाढत आहे. मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान सख्तीचे करणारा कायदा केला पाहिजे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज व्यक्त केले.
मतदान बुथ हा एक हजार मतदारसंख्ये ऐवजी पाचशे मतदार संख्या असणारा छोटा मतदान बुथ करावा म्हणजे मतदानासाठी मोठी गर्दी रांग लागणार नाही. तसेच मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.मताधिकार जे वापरणार नाहीत मतदान जे करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करणारा आणि सख्तीचे मतदान करणारा कायदा झाला तर मतदानाची टक्केवारी वाढू शकेल. वाढेल नट टक्का आहे विश्वास पक्का.
मतदान ऐच्छिक आहे. मात्र मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सर्वांनी मतदान करावे.मतदानाची टक्केवारी वाढवावी.मतदान करा लोकशाही मजबूत करा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज नवजीवन विद्यामंदिर बांद्रा पूर्व येथे मतदानाचा अधिकार बजावल्या नंतर केला.
यावेळी त्यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले आणि पुत्र जीत आठवले यांनी मतदान केले.
आम्ही लोकांसोबत आहोत.लोक आमच्या सोबत आहेत. त्यामुळे लोकांचा कौल हा महायुतीला निश्चित मिळेल असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी आज व्यक्त केला.
बांद्रा येथील मतदान केंद्रात दुजाभाव झाल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार
मतदान केंद्रात मतदान करताना अनेक उमेदवार आणि नेत्यांचे फोटो काढण्यात आले.मात्र बांद्रा पूर्व गांधीनगर मधील नवजीवन विद्या मंदिर मतदान केंद्रात केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्यासोबत एकाही फोटोग्राफर ला आत सोडण्यात आले नाही.निवडणूक आयोगाने अधिकृत परवानगी दिलेला ओळखपत्र पास असणाऱ्या एका फोटोग्राफर ला आत सोडावे अशी वारंवार विनंती केल्या नंतर ही पोलिसांनी एका ही फोटोग्राफर ला आत सोडण्यास मनाई केली. हा रिपब्लिकन पक्षाशी दुजाभाव झाल्याची भावना आठवलेंच्या समर्थकांमध्ये पसरली.त्याविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून ना.रामदास आठवले यांच्या कार्यालयाने बांद्रा विधानसभा मतदारसंघ नवजीवन विद्यामंदिर मतदान केंद्रावरील तैनात पोलीसांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली.