सांगोला – नुकतीच सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर-मिरज-कलबुर्गी स्पेशल एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. यामुळे येणाऱ्या दिवाळी निमित्त देवदर्शन यात्रा करणाऱ्या भाविकांची उत्तम सोय झालेली आहे. या रेल्वेचा स्पेशल दर्जा असल्याने दर ही वाढीव आहेत. तरीही प्रवासी व भाविकांची या रेल्वेला पसंती आहे. परंतु या रेल्वेचे वेळापत्रक पाहिले असता या गाडीसाठी लुज टाइमिंग भरपूर प्रमाणात देण्यात आलेला आहे.
ही रेल्वे आज तागायत सुमारे तीन ते साडेतीन तास उशिराने धावते. प्रवासात ही रेल्वे मध्येच एखाद्या स्थानकावर तासनतास थांबवुन ठेवली जाते. यामुळे प्रवाशांनी व भाविकांनी केलेले नियोजन विस्कळते व नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
तरी या रेल्वेचे लूज टाइमिंग कमी करून सकाळच्या सत्रातील कोल्हापूर-कलबुर्गी स्पेशल एक्सप्रेस वेळेवर पोहोचवण्यात यावी व परतीच्या प्रवासासाठी कलबुर्गी येथून रात्री उशिरा नऊ वाजता सोडण्यात यावी अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना, सांगोला यांच्यावतीने करण्यात आली आहे.