पांगरी: बार्शी तालुक्यातील चिंचोली येथे जोशाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चिंचोली संस्थेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले तरुण. या कार्यक्रमाचे उद्घाटक पांगरी पोलीस स्टेशनचे एपीआय हेमंत काटकर होते तर प्रमुख वक्ते प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघ व्यसनमुक्ती कक्ष प्रमुख डॉक्टर संदीप तांबारे हे उपस्थित तरुण. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये डॉक्टर शेषराव सानप, मराठा सेवा संघ धनंजय गरड, अविनाश इंगोले, शंकर गोसावी, बाळराजे माढा, नानासाहेब चांदणे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर जोशाबा संस्थेच्या वतीने प्रमुख उपस्थित् संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व पत्रकार अनिल खुणे यांनी केले. राष्ट्रपुरुषाचे व्याख्यान रुपी कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये विशेष छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले यांच्या जीवनावर व्याख्यान रुपी कार्यक्रम घेण्यात आले. हे प्रस्ताविकेत कथन यापुढे संस्थेच्या वतीने सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे.
डॉक्टर संदीप तांबारे यांनी आपल्या मनोगत खरं आणि खोटं यामधील भेद दर्शवण्यासाठी महात्मा फुलेंनी शाळा चालू केल्या असे मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय खुणे, नितीन खुणे, महेश खुणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. चिंचोली चे सरपंच अमर कसबे, उपसरपंच अजित शिंदे, राजाभाऊ शिंदे, धनंजय शिंदे इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पवार यांनी केले तर आभार संजीव खुणे यांनी मानले.





















