तभा फ्लॅश न्यूज/परवेझ मुल्ला : बस स्थानकावर गोर – गरीब जनतेसाठी कायदा माहित व्हावा या उद्देशाने न्याय आपल्या दारी या योजनेमधून जिल्हा विधीसेवा प्राधिकरण धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने कळंब बस स्थानकावर विधी सेवा प्राधिकरण कायदेविषयक माहिती,जेष्ठ नागरिकांचे अधिकार ,कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा व रॅगिंग अशा विविध कायद्यांचा जनजागृती संदर्भात मान्यवरांनी प्रबोधन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आगारप्रमुख एस. डी. खताळ या कार्यक्रमासाठी न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक पी . एस . पारवे ,ए . यु . लोकरे ,आसिम मुल्ला ,ज्येष्ठविधीज्ञ त्रिंबक मनगिरे ,प्रवासी मित्र संघटनेचे प्रा . मोहन जाधव, स्थानक पोलीस संतोष इंगळे यांनी कायदेविषयक ज्ञान सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगितले .
या कार्यक्रमासाठी कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती, सहाय्यक वाहतूक निरीक्षक अभिजीत धाकतोडे, प्रभाकर झांबरे ,वाहतुक नियंत्रक प्रशांत नानजकर , नामदेव जगताप ,गोविंद जाधवर ,ए .वाय . पठाण , हनुमंत मुंडे ,विलास जाधव , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गणेश गोरे यांनी केले तर महिला कर्मचाऱ्यांमध्ये अलका भोसले , प्रियंका शिंदे, अनुराधा पवार , तरमिम शेख, अश्विनी तिडके,वंदना पालके,संध्या कुमठेकर; राजकन्या गवळी होते.