अक्कलकोट – करजगी (ता. अक्कलकोट) येथे श्री 1008 मृगेंद्र शिवाचार्य महाराज (मठसंस्थान हिरेमठ) यांच्या करजगी येथे झालेल्या लिंगैक्य अंत्यविधी व स्मरण सभेचा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास श्री. श्री. श्री. 1008 ज्ञान सिंहासनाधीश विश्वराज्य शिवाचार्य महास्वामीजी 1008 ( काशी पीठ) श्री जंगमदेव महालिंगस्वामी, श्री. श्री. श्री. 1008 श्री जय सिद्धेश्वर महास्वामीजी (गंगामठ),श्री 108डॉ जय सिद्धेश्वर महास्वामीजी (गौडगाव),श्री 108 पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी (माळकोट),श्री म.नी.प्र. शिवानंद महास्वामीजी (करजगी) तसेच कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध मठांचे शिवाचार्य, स्वामीजी, धर्मगुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी करजगी, ताडवळ, हुबळी, अक्कलकोट, सोलापूर, चंद्रपूर, बाळगाव, हिंगणी आदी गावांतील सुमारे 40 ते 50 हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन व श्रद्धांजली अर्पण केली.
परमपूज्य मृगेंद्र शिवाचार्य महाराजांनी आपल्या 42 वर्षांच्या कार्यकाळात धर्मप्रसार, समाजप्रबोधन व भक्तांमध्ये आध्यात्मिक चेतना निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या अंत्यसंस्काराचा विधी शैव परंपरेनुसार भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडला.
या प्रसंगी भजन, कीर्तन व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच धर्मसभा घेऊन उपस्थित धर्मगुरूंनी महाराजांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी जगद्गुरु श्री 1008 रामपुरी पीठ (बाळेकुंद्री) यांचे थेट ऑनलाइन संबोधन झाले. त्यांनी सर्व भक्तगणांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत शोकसंतप्तांना धीर दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करजगी येथील सर्व भक्तगण व सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



























