सोलापूर – जिल्हा परिषद,सोलापूर व पंचायत समिती,शिक्षण विभाग, अक्कलकोट यांच्या वतीने आयोजित जि.प.शाळेतील विद्यार्थी क्रीडा स्पर्धा सन 2025-26 अक्कलकोट तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा फत्तेसिंह मैदान, अक्कलकोट येथे उत्साहात पार पडले. तालुकास्तरावर झालेल्या लंगडी लहान गट मुलांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, लोहारवस्ती, करजगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अक्कलकोट तालुक्यात प्रथम क्रमांकाने विजयी झाले आहेत.
लंगडी खेळातील यशस्वी खेळाडूत वसीम मुबारक कोरबू (कॅप्टन), सुशांत सिद्धाराम पुजारी (उपकॅप्टन), आहिल दस्तगीर शेरीकर, प्रवीण नरसप्पा नायकोडी, सरवर्ष श्रीशैल नायकोडी, रहिमान सादिक शेरीकर, साजीद इब्राहिम मदरी, चरण चंद्रशेखर नायकोडी, वेद पिरोजी माळी, विलास शरणप्पा नायकोडी, ऋषिकेश परशुराम संकद, प्रितम परशुराम नायकोडी, प्रमोद नरसप्पा नायकोडी, विनायक नागप्पा नायकोडी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
यशस्वी खेळाडूंचे अक्कलकोट तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे साहेब, करजगी बीट चे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय श्री.लक्कप्पा पुजारी साहेब, मैंदर्गी बीट चे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय श्री.सोमशेखर स्वामी यांनी छोट्या, कमी पटसंख्या असलेल्या वस्ती शाळेच्या लहानग्या खेळाडूंनी संपूर्ण तालुक्यातून विजयी होणे हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे असा गौरवोद्गार काढत खेळाडूंचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे श्री.बसवराज परतबादी, श्री.इसाक नागणसुरे यांचे अभिनंदन व कौतुक केले. यशस्वी खेळाडूंना ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले आणि पुढील जिल्हास्तर स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आले. यशस्वी संघाचे करजगी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. मल्लिकार्जुन पाटील यांनी अभिनंदन केले.
या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील सर्व सन्माननीय केंद्रप्रमुख साहेब, गट साधन केंद्रातील विषयतज्ञ श्री.गणेश अंबुरे, श्री.शरद कुंभार, श्री.गोविंद राठोड, श्री.विशाल शेटे, श्री.संतोष बारगुले, श्री.तुकाराम जाधव, श्री.सिध्दू विटकर, सर्व पंच, सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांचे बहुमोल असे सहकार्य लाभले.
























