सोलापूर – आसामचे अबोर लोकसभा मतदारसंघाचे खासदार तसेच काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई व काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे यांचे सोलापूरमध्ये आगमन झाल्यावर शहर व जिल्हा काँग्रेसकडून स्वागत करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करून स्वागत करण्यात आले.
गौरव गोगोई हे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. अभ्यासू खासदार म्हणून यांची ख्याती आहे.
सोलापुरात आगमन झाल्यानंतर शहर व जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ समाधी मठ, मंदिर व अन्नछत्र मंडळ येथे दर्शन घेतले .
श्री स्वामी समर्थ मंदिरात व अन्नछत्र मंडळात गौरव गोगोई व पृथ्वीराज साठे यांचा मंदिरा तर्फे व अन्नछत्र मंडळातर्फे सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, अक्कलकोट तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, अरुण जाधव, अशपाक बळोरगी, माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेसचे गणेश डोंगरे, मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, देवा गायकवाड, बसवराज म्हेत्रे, शंकर नरोटे, रुपेश गायकवाड, सुभाष वाघमारे , सुनील सारंगी, रोहित शटगर , संजय गायकवाड, सागर उबाळे, अनिल जाधव, निशांत कवडे, मुस्तफा बाळोरगी, दिगंबर मेटकरी, सौरभ साळुंखे, सुनील गुप्ता ,बापू वाघमोडे, शरण आलोळी आदि उपस्थित होते.

















