सोलापूर – विजापूर रोडचे काम सुरू आहे. ब्रिज बंद करण्यात आल्याने प्राणी संग्रहालय समोरील रस्ता जाम झाला होता. छोटा बोगदा पुर्णपणे जाम झाला होता. गांधी नगर, होटगी रोड ते आसरा पूल पर्यंतचा रोड एक किलोमीटर लांबच लांब रांग वाहनांच्या होत्या . वाहतूक शाखेचे ढिसाळ नियोजन दिसून आले. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. दुचाकी, चारचाकी, ट्रॅव्हस बस, रिक्षा यांच्या लांबच लांब रांगा मोठ्या प्रमाणात होत्या. यामध्ये पोलिसांची गाडी ही अडकल्याचे दिसून आले.
कंबर तलावाच्या समोर व विजापूर रोड च्या बाजूने बॅरिकेटिंग करून रस्ता बंद करण्यात आला होता. विजापूर रोड वरील रेल्वे ब्रिजच्या कामासाठी पाच तास बंद करण्यात आला होता. काम तीन तासात पूर्ण करण्यात आले. यासाठी अत्याधुनिक यंत्र सामग्री वापरण्यात आली होती.

दमानी नगरचा पूल बंद केल्यावर किती हाल होतील?
दमानी नगरचा पूल बंद झाल्यानंतर किती हाल होतील याची दक्षता घेणे गरजेचे आहे. पोलीस व महापालिका प्रशासनाने वेळीच याची दखल घेऊन जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.



























