भोकरदन / जालना – क्षिरसागर रोड, भोकरदन यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय, भोकरदन तसेच पाणी शुद्धीकरण केंद्र (वॉटर फिल्टरेशन प्लांट) येथे शैक्षणिक क्षेत्रभेट (Field Visit) आयोजित करण्यात आली.
या क्षेत्रभेटी दरम्यान विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयातील विविध विभाग, आरोग्य सेवा पद्धती, औषध वितरण प्रक्रिया, आपत्कालीन उपचार पद्धती तसेच रुग्णसेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक साधनांची माहिती मिळाली. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत उपयुक्त माहिती प्रदान केली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी पाणी शुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया, वापरली जाणारी यंत्रसामग्री, फिल्ट्रेशनच्या टप्प्यांची माहिती तसेच स्वच्छ व सुरक्षित पाणी जनतेपर्यंत कसे पोहोचवले जाते याबाबत प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त केले.
या शैक्षणिक क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांचे व्यवहारज्ञान वाढून त्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भर पडली आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी सभापती एल.के.दळवी, प्राचार्य व प्राध्यापक यांनी या उपक्रमाचे नियोजन करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळविण्याची संधी उपलब्ध करून दिली.
— गुरुकुल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, भोकरदन

















