बार्शी – स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळ व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा पळूस, जि. सांगली यांचेवतीने साहित्यिक व संत साहित्याचे गाढे अभ्यासक श्री .दत्ता गोसावी यांना त्यांचे ‘आता तरी पुढे हाचि उपदेश’, या संत तुकाराम महाराज यांचे उपदेशपर अभंगावर केलेल्या रसाळ विवेचन पर ग्रंथास जेष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर स्मृती साहित्यरत्न पुरस्कार घोषित झाला असून, हा पुरस्कार ३६ व्या ग्रामीण साहित्य संमेलनात पळूस, जि. सांगली येथे मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. हे संमेलन दि.२८ डिसेंबर रोजी पळूस येथे संपन्न होत आहे.
या पूर्वी ही श्री. दत्ता. गोसावी यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. हा पुरस्कार घोषित झाल्यामुळे त्यांना साहित्यिक मुकुंदराज कुलकर्णी, पां.न. निपाणीकर, बी. आर. देशमुख, डॉ. रविराज फुरडे, कवी प्रकाश गव्हाणे , प्रा. प्रमिला देशमुख, रामचंद्र इकारे तसेच सर्व मसाप. सदस्य व कवी कालिदास मंडळ सदस्यांनी अभिनंदन केले आहे .



























