भोकरदन / जालना : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शनिवारी 6 डिसेंबर रोजी भोकरदन येथे अभिवादन करण्यात आले.
सकाळी 9.00 वाजेच्या सुमारास रमाई नगर, नवे भोकरदन येथील अशोका बुद्ध विहारात बौद्ध बांधवांच्या वतीने सामूहिक वंदना घेण्यात येऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
त्यानंतर सकाळी 10.00 वाजेच्या सुमारास सिल्लोड कॉर्नर वरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्रिशरण -पंचशील वंदना घेण्यात आली तसेच बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष मुकेश चिने, दीपक मोरे, प्रकाश देशमुख,प्रा टी आर कांबळे, बाबुराव पगारे, भीमराव भिसे,माजी नगरसेवक चंद्रकांत पगारे, माजी नगरसेवक दीपक बोर्डे, स्मारक समितीचे सचिव सचिन पारखे,पत्रकार सुरेश बनकर, प्रदीप जोगदंडे, माजी नगरसेवक कदीर बापू, सुमित थारेवाल, विशाल मिसाळ, कमलकिशोर जोगदंडे, प्रकाश सुरडकर, संजय आढावे, नितीन म्हस्के, विजय सावंत यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व तरुण आंबेडकरी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.























