सोलापूर – कळंब तालुक्यातील पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर् व ओव्हाळ आणि लोखंडे , देशमाने ‘ क्षीरसागर , तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव सांगीतला .
याप्रसंगी गावातील सर्व नागरीक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वार्यक्रमाची शोभा वाढवत सर्वांनी मिळून हा कार्यक्रम सादर केला होता या कार्यक्रमप्रसंगी सर्व उपस्थिताचे शाळेच्यावतीने आभार ही मानले.























