बार्शी – शहरातील विविध गणेश मंडळांत आज गणेश जयंतीनिमित्त मंदिरांमध्ये श्री गणेशाची आरती करुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रसन्नदाता गणेश मंडळ, चिंतामणी गणेश मंडळ, भवानी पेठ गणेश मंडळ, धर्माधिकारी प्लाॅटमधील पेशवे युवामंच गणेश मंदिर, श्री सौख्यदाता गणेश प्रतिष्ठान आदी ठिकाणी श्री गणेश जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी श्री गणेशाचे भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी व मित्रमंडळींनी विशेष परिश्रम घेतले.
भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गणेश जयंती उत्सव भक्तिभावात व आनंदात यशस्वीपणे पार पडला.


























