मुखेड / नांदेड – मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री रामदास पाटील जाधव उमरदरीकर यांना डीएसपी न्यूज चॅनल लाइव्ह यांच्या वतीने दिला जाणारा “महाराष्ट्र भूषण ” पुरस्कार जाहीर झाला आहे.
उद्या खटाव जिल्हा सातारा येथे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते तर मंत्री ना.जयकुमार गोरे आणि मंत्री ना.दत्ता मामा भरणे यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील डीएसपी लाईव्ह न्युज चैनल यांच्यावतीने सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या समाजसुधारकास महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
तालुक्यातील उमरदरी येथील श्री रामदास पाटील जाधव यांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिल्हाभरात सामाजिक संघटन उभे करत या माध्यमातून समाजाची वैचारिक मशागत करण्याचे कार्य केले आहे . रामदास पाटील यांच्या सामाजिक चळवळीतील योगदानाची नोंद घेऊन श्री रामदास पाटील यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला होता.
उद्या दिनांक नऊ नोव्हेंबर 2025 रोजी वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य समारंभात या पुरस्काराचे वितरण खासदार छत्रपती उदयनराजे भोसले ,ना. जयकुमार गोरे ,ना. दत्तामामा भरणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
सदर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री रामदास पाटील जाधव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.




















