बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित ,महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बार्शीची इयत्ता अकरावी कला शाखेची कौशल्याधारित शिक्षण शालेय उपक्रमांतर्गत वारणा दूध डेअरी व ॲग्रो इंडस्ट्रीज लि. शाखा बार्शी येथे क्षेत्र भेट आयोजित करण्यात आली होती.
या क्षेत्र भेटी दरम्यान वारणा दूध संघ बार्शीचे जनरल मॅनेजर प्रशांत घेवारी व प्रोडक्शन मॅनेजर प्रदीप मगर यांनी सर्वांचे स्वागत केले. नंतर प्रदीप मगर यांनी दूध संकलन, दूध शीतकरण, पाश्चरायझेशन, दूध पॅकेट पॅकिंग या सर्व प्रक्रियेची प्रत्यक्ष सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
तसेच तेथील प्रत्येक विभाग सांभाळणारे कर्मचारी, त्यांचे कॉलिफिकेशन, त्यांना असणारे मशीन दुरुस्तीचे कौशल्य याबद्दल सविस्तर व सखोल माहिती दिली. या विद्यार्थ्यांनी दिलेल्या क्षेत्र भेटीसाठी त्यांनी समाधान व्यक्त केले. कला विभाग प्रमुख संजय बागल यांनी सर्व वारणा डेअरीच्या कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
विद्यालयाच्या प्राचार्य के.डी.धावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. या सदर क्षेत्र भेटीसाठी विभाग प्रमुख एस. बी .बागल, के. आर. जाधव , जे.पी.डमरे व सर्व विद्यार्थी यांनी वारणा दूध डेअरीला भेट दिली.
















