Sunday, February 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या तब्बल 406 धावा; कर्णधार सचिन धस 199 धावावर नाबाद

तरुण भारतbyतरुण भारत
February 22, 2026
in sports
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर बीसीसीआयच्या 23 वर्षाखालील मुलांच्या कर्नल सी के नायुडू क्रिकेट स्पर्धेतील तिसरा उपांत्यपूर्व सामना महाराष्ट्र व झारखंड संघात सुरू झाला असून पहिल्या दिवशी महाराष्ट्राने पहिल्या डावात 7 बाद 406 धावा केल्या असून कर्णधार सचिन धस 199 धावा करून खेळपट्टी वरती टिकून आहे. पहिला बळी दुसऱ्या षटकात मिळविल्यानंतर झारखंडची गोलंदाजी पिष्प्रभ करत दुसऱ्या गड्यासाठी 195 धावांची भागीदारी सचिन धस व नीरज जोशी यांनी केली.

स्पर्धेच्या नियमानुसार पाहुण्या संघाला कौल दिला जातो, त्याप्रमाणे झारखंड संघाने सकाळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, आणि पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत महाराष्ट्राचा यष्टिरक्षक साहिल औताडे याने सुरेख सुरुवात केली खरी, पण दुसऱ्याच षटकात शुभ शर्मा ने यष्टिरक्षक प्रभातकुमार माहतो कडे झेल देण्यास भाग पाडून सलामीची जोडी फोडली. त्यानंतर कर्णधार सचिन धस आणि नीरज जोशी यांनी संयमी खेळी करत दुसऱ्या गड्यासाठी 75 मिनिटात, 15 षटकात 50 धावांची भागीदारी करत धावफलक हलता ठेवला.

हीच भागीदारी दोघांनी एकेरी, दुहेरी तसेच प्रसंगी चौकार मारत 100 पार नेली. दरम्यान नीरज ने 68 चेंडूत 9 चौकारांनिशी वैयक्तिक अर्धशतक लगावले आणि पाठोपाठ सचिन धस ने देखील दमदार खेळी करत 50 धावा पूर्ण केल्या. जेवणाला खेळ थांबला तेव्हा 33 षटकात 129 धावा फलकावर लागल्या होत्या.

जेवणानंतर पुन्हा संयमी फलंदाजी करत दोन्ही फलंदाज नव्वदित पोचले, आणि शतकाला केवळ 3 धावा हव्या असताना नीरज जोशीला कौनैन कुरेशी ने कर्णधार राजन दीप कडे झेल देण्यास भाग पाडले व दुसऱ्या गड्याची 195 धावांची भागीदारी संपुष्टात आणली.

त्यानंतर आलेल्या, स्पर्धेत महाराष्ट्र कडून सर्वाधिक शतक, धावा करणारा दिग्विजय सोबत 63 धावांची भागीदारी करताना सचिन ने शानदार असे शतक झळकावले ते 13 चौकार, 2 षटकार लगावत. संघाच्या 264 धावा झाल्या असताना दिग्विजय  पाटील (29) हा अमित कुमारच्या गोलंदाजीवर राजन दीप कडे झेल देऊन बाद झाला. सोलापूरचा स्थानिक खेळाडू अर्शिन कुलकर्णी त्यानंतर फलंदाजी साठी आल्यावर सामना पहायला आलेल्या लहान खेळाडू, चाहत्यांनी एकच जल्लोष केला पण केवळ 8 धावा करून 19 वर्षाखालील भारतीय संघाकडून, तसेच दुलीप ट्रॉफी खेळलेल्या फिरकी गोलंदाज मनीषी याला एक उंच फटका मारण्याच्या नादात अर्शिन सीमारेषेजवळ नकुल यादव कडे झेल देऊन परतला.

त्याच्या पुढच्याच षटकात हर्ष मोगावीरा देखील लगेच शून्यावर अमित कुमार कडून पायचीत झाला आणि पंचांनी चहापानाला खेळ थांबविला तेव्हा 5 बाद 286 (62.5) धावसंख्या झालेली.

चहापान नंतर आलेला विकी ओस्तवाल सोबत सचिन ने 28 धावांची भागीदारी करत स्वतःचे दीडशतक देखील पूर्ण केले. अमित कुमारने पुन्हा एक पायचितचा बळी मिळवत विकी ओस्तवाल (13) ला माघारी धाडले. 

विकी नंतर किरण चोरमले हा फलंदाजीला आला आणि ताबडतोब अशी फलंदाजी करायला सुरुवात केली आणि 2 चौकार, 3 उत्तुंग षटकार लगावले. 26 चेंडूत 31 धावा केल्यावर अमित कुमारला फटका मारण्याच्या नादात किरण कौनैन कुरेशी कडे झेल देऊन तंबूत परतला.

दुसऱ्या बाजूने कर्णधार सचिन ने एक बाजू लावून धरत 20 चौकार लगावले, सोबत 4 षटकार देखील मारत 190 पार पोचला आणि संघाची धावसंख्या 350 पार नेली.

372 धावावर किरण चोरमले बाद झाल्यावर आलेल्या अजय बोरुडे सोबत संयमी फलंदाजी करत सचिन ने धावसंख्या 400 चे वर नेली.

पहिल्या दिवशीचा खेळ संपायला 2 षटके शिल्लक असताना सचिन 192 धावा वर नाबाद होता, त्यानंतर टोन चौकार लगावला, पुढच्या चेंडूवर दुहेरी धाव घेतली. शेवटच्या षटक मधील दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतल्यावर तो 199 धावांवरती पोहोचला आणि द्विशतक करणेसाठी त्याला एका धावेची गरज असताना त्याचा साथीदार अजय बोरुडे याने शेवटचे चार चेंडू निर्धाव खेळून काढले व पंचांनी दिवसाचा खेळ थांबविला असून उद्या दुसऱ्या दिवसाचा पहिला चेंडू सचिन खेळणार असून त्यावर तो  200 पूर्ण करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

झारखंड कडून अमित कुमार याने 82 धावा देत 4 तर शुभ शर्मा, मनीषि व कौनैन कुरेशी यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला आहे.

Post Views: 8
Previous Post

शिवरत्न सेमी मध्ये स्पर्धा परीक्षा अकॅडमी सुरू करणार – शितलदेवी मोहिते पाटील

Next Post

इतिहासाने नोंद घ्यावी असे कार्य करा – ॲड.गजानन भाकरे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

इतिहासाने नोंद घ्यावी असे कार्य करा - ॲड.गजानन भाकरे

ताज्या बातम्या

नागपूरात दोन पेपर फुटले…#10thmaths #10thexam #public #solapurnews #viral

February 22, 2026

एज्युकेशन सोसायटी संचलित, पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंती उत्सव व बक्षीस वितरण

February 22, 2026

चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक महाराज मंदिराला सुवर्ण कळस अर्पण

February 22, 2026

सराफ व्यापाऱ्याला चारचाकी वाहनाने धडक देऊन लुटण्याचा प्रयत्न

February 22, 2026

‘A+’  मूल्यांकन प्राप्त सोलापूर शहरातील एकमेव श्री दिगंबर जैन गुरुकुल शाळा

February 22, 2026

मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूल, येथे वार्षिक क्रीडा स्पर्धांचा उत्साहात समारोप

February 22, 2026

महर्षि संकुल यशवंतनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

February 22, 2026

वेळापूर भक्ती निवास येथे विविध उपक्रमाने शिवजयंती साजरी

February 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0694160

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697